ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

गौतमी पाटीलची लावणी होणार बंद? “माझी काळजी कोण करणार…”

पुणे : (Guatami Patil Lavani actress dancer) मागील काही महिन्यांपासून तिच्यातील असलेल्या कलागुणांमुळे गौतमी पाटील मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी झाली आहे. खासकरुन मराठी मनोरंजन जगतात तर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. ज्याठिकाणी गौतमीचा कार्यक्रम असेल तिथे हमखास तुफान गर्दी होताना दिसत आहे. यावरुन तिची असलेली लोकप्रियता लक्षात येते.

दरम्यान, माडा तालुक्यातील पिंपळफुटा गावात गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. त्यामुळे पोलिसांचा प्रेक्षकांवर ताबा राहताना दिसत नाही.अशातच आता गौतमीच्या लावणीवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी. अशी मागणी मोठ्या प्रमाणवर जोर धरु लागली आहे. या सगळ्यात गौतमीची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

यावर बोलताना गौतमी म्हणाली, काहीही झालं तरी लावणी बंद होणार नाही. खासकरुन ग्रामीण भागातील लोकांचे माझ्यावर प्रेम आहे. मला माहिती आहे की, लोकांना माझे कार्यक्रम आवडतात. त्याची लोकप्रियता वाढते आहे. काही चुका झाल्या असतील. त्यावरुन माफीही मागितली आहे. पण कार्यक्रम बंद करण्यापूर्वी माझाही विचार करावा, अशी प्रतिक्रिया तिने माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये