राऊतवाडीत सोयाबीन शेतीबाबत मार्गदर्शन
शिक्रापूर : येथील राऊतवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताहानिमित्ताने शेतकर्यांसाठी सोयाबीन पिक शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेतकर्यांना सोयाबीन पिक शेतीबाबत मार्गदर्शन
करण्यात आले. राऊतवाडी येथे शेतकर्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन दरम्यान कृषी सहाय्यक अशोक जाधव यांनी शेतकर्यांना सोयाबीन पिकासाठी जमीन, वाण, बियाणे खरेदीची काळजी, बियाणे उगवण तपासणी, बीजप्रक्रिया, पेरणी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, खत वापर, संरक्षित पाणी व्यवस्थापन, कीड, रोग व चक्री भुंगा यांसह आदी प्रकारची माहिती देत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रगतशील शेतकरी भरत म्हेत्रे, दिलीप वाबळे, नामदेव राऊत, मारुती राऊत, विजय विरोळे, हनुमंत राऊत, गोपीचंद राऊत, काळूराम बालवडे, कृषि मित्र तानाजी राऊत सुदाम गायकवाड, पुंडलिक राऊत, पंढरीनाथ राऊत, कारभारी भूमकर, तुकाराम राऊत, प्रशांत वाबळे, मल्हारी राऊत, कचरू राऊत, राधु भूमकर, एकनाथ राऊत यांसह आदी शेतकरी उपस्थित होते. तर यावेळी प्रगतशील शेतकरी दिलीप वाबळे यांनी उपस्थित शेतकर्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले. दरम्यान कृषि मित्र तानाजी राऊत यांनी सर्व अधिकारी व शेतकर्यांचे आभार मानले.