“…म्हणून मी बंडखोरी केली! गुलाबराव पाटलांकडून गद्दारी केल्याची कबुली
जळगाव : (Gulabrao Patil On Sharad Pawar) आठ महिन्याखाली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली. तेव्हापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जात आहे. त्यांच्या या टीकेला गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो हा तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार आहे.
गद्दारी, बंडखोर, पन्नास खोके एकदम ओके या टीकेवरून अनेकदा शिंदे गट आणि ‘मविआ’च्या नेत्यामध्ये वादाची पडली आहे. वारंवार होणाऱ्या टीकेवर गुलाबराव म्हणाले, मी गद्दार झालो नाही तर, एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता आणि त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली अशी स्पष्ट कबुली गुलाबराव पाटलांनी जळगावातील एका कार्यक्रमात दिली.
पुढे बोलताना गुलाबराव म्हणाले, तुम्ही काय आमच्यावर टीका करता, “शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असं म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला” असं म्हणत एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केल्याची कबुली गुलाबराव पाटलांनी दिल्याने शिंदे गटाची पुन्हा एकदा अडचण झाली आहे.