ताज्या बातम्यारणधुमाळी

“शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा झालीच पाहिजे पण…”, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य

जळगाव | Gulabrao Patil On Uddhav Thackeray – शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dasara Melava) आयोजित करण्यावरून शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात चांगलाच वाद सुरू होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटानं पहिली न्यायालयीन लढाई जिंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

ही केवळ तीन तासांची सभा आहे, यासाठी खूप मोठी लढाई जिंकलो म्हणणं योग्य नाही. दसरा मेळाव्यात कुणाकडे जास्त लोकं येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळवून शिवसेनेनं (Shivsena) पहिली न्यायालयीन लढाई जिंकली आहे, याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, याला लढाई म्हणण्यासारखं काय आहे? यामध्ये त्यांना न्याय मिळाला आहे. त्यांची सभा शिवाजी पार्कवर झाली पाहिजे, असं न्यायालयानं म्हटलं असेल तर सर्वांनी ते मान्य केलं पाहिजे. आम्हीही मान्य केलंय. आम्ही आमची बीकेसीमध्ये तयारी सुरू केली आहे. त्यामुळे फार मोठी लढाई जिंकलो, असं म्हणण्याची काही गरज नाही. ही केवळ तीन तासांची सभा आहे. दसरा मेळाव्यासाठी कुणाकडे जास्त लोकं येतात, यावर सगळ्यांचं लक्ष आहे.

पुढे गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवाजी पार्क आम्हाला मिळावं, यासाठी शिवसेना पक्ष न्यायालयात गेला नव्हता. तिथला एक स्थानिक आमदार न्यायालयात गेला होता. ठाकरे गटाला शिवतीर्थ देऊ नका, अशी मागणी आम्ही केली नव्हती. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. तिथे त्यांची सभा झालीच पाहिजे, फक्त तेथून सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि शरद पवारांचे (Sharad Pawar) विचार मांडू नका, एवढीच अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये