ताज्या बातम्यारणधुमाळी

“मुख्यमंत्रीपद सोडलं, वर्षा सोडलं पण…”; शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा!

मुंबई | Gulabrao Patil On Uddhav Thackeray – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 35 हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोर आमदारांची गुवाहाटीत बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं, वर्षा सोडलं, पण शरद पवारांना (Sharad Pawar) सोडायला अजून तयार नाही अशा शब्दात शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, आपण १०० टक्के शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने याठिकाणी पोहचलो आहोत. आपण या पदापर्यंंत पोहचण्यात आपली किमान २० टक्के मेहनत नक्कीच आहे. आपण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी खूप काही केले आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हाला 52 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत,’ अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसंच गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. आपल्यावर सध्या आपापल्या मतदारसंघात आरोप आणि टीका होत आहे. मात्र, त्याचवेळी काही लोक आपल्या पाठिशी उभेही राहत आहेत. आपण एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन इकडे आलोय. आपल्यावर टीका करणाऱ्यांना आपला संघर्ष माहिती नाही. १९९२ च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. संजय राऊत यांना ३०२ काय असते, दंगलीच्यावेळी काय परिस्थिती असते, हे माहिती नाही. हे फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्यक्षात काम केलेले कार्यकर्ते आहोत, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये