“दीड वर्षाच्या मुलावर टीका करणे चुकीचे असून उद्या आदित्य ठाकरेंनाही…”, गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

मुंबई | Gulabrao Patil On Uddhav Thackeray – शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे झाले. एकीकडे शिवसेनेचा (Shivsena) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) तर दुसरीकडे शिंदे गटाचा (Shinde Group) बीकेसी मैदानावर (BKC Ground) दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांच्या नातवाचाही उल्लेख केल्यानं एकनाथ शिंदेंना राग अनावर झाल्याचं त्यांच्या भाषणातून दिसून आलं. तसंच उद्धव ठाकरेंच्या त्या विधानावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात आता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
दीड वर्षाच्या मुलावर उद्धव ठाकरे यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीने टीका करणे हे निषेधार्ह आणि चुकीचं आहे. राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. तसंच दीड वर्षाच्या मुलावर टीका करणे अतिशय चुकीचे असून उद्या आदित्य ठाकरे यांनाही मूलबाळ होणार आहे, त्यांनी अशी टीका करायला नको होती, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत 35 वर्षे जवळ राहिलोय पण उद्धव साहेबांना घसरताना मी पाहिलं नाही. त्यांच्यासारख्या अभ्यासू माणसानी एका छोट्याश्या दीड वर्षाच्या बाळावर अशी टीका करावी, हे चुकीचं आहे. आदित्यलाही मुलं होतील, मग? राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये अशी अपेक्षा असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना “बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे.” असं म्हटलं होतं.