ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“राऊतांना विचारा डील झालेले पैसे…”, गुलाबराव पाटलांचं खोचक टीकास्त्र

औरंगाबाद | Gulabrao Patil On Sanjay Raut – शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगानं (Election Commission) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (CM Eknath Shinde) दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केला आहे. धनुष्यबाणासाठी तब्बल दोन हजार कोटींची डील झाली असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. दरम्यान, राऊतांच्या या टीकेला आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. आज (20 फेब्रुवारी) सकाळी औरंगाबाद विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते.

धनुष्यबाणाची डील तब्बल दोन हजार कोटी रुपयांत झाली असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला. यावर माध्यमांनी गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना त्यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं. “संजय राऊतांनाच विचारा डिल झालेले पैसे कुठे ठेवलेत, नोटा किती होत्या”, असं पाटील म्हणाले. पुढे ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे असं विचारलं असता, जाऊ द्या असं म्हणत गुलाबराव पाटलांनी खिल्ली उडवली.

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?

शिवसेनेचं चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आत्तापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. तसंच, हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याचंही राऊत म्हणाले आहेत. राऊतांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये