ताज्या बातम्यामनोरंजन

“आमच्या गुरूजींनी मांडले आहेत समोर चार पाठ…”, राणादाचा पाठकबाईंसाठी हटके उखाणा

पुणे | Akshaya Deodhar – Hardeek Joshi Wedding – ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) यांचा शुक्रवारी (2 डिसेंबर) शाही विवाहसोहळा थाटात पार पडला. मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकचा विवाहसोहळा पार पडला असून त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. तसंच लग्नविधी झाल्यानंतर हार्दिकनं अक्षयासाठी हटके उखाणा घेतला.

हार्दिक अक्षयासाठी खास उखाणा घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “पाहा आमच्या गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ, अक्षयाचं नाव घेतो आता बघा आमच्या लग्नाचा थाट”, असा हटके उखाणा हार्दिकनं घेतला आहे. तसंच त्यानं हा उखाणा घेताच अक्षया लाजल्याचंही दिसत आहे. त्या दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी पाहण्यासारखं आहे.

दरम्यान, अक्षयानं लग्नासाठी खास हातमागावर विणलेली लाल रंगाची नऊवारी पैठणी साडी नेसत पारंपरिक लूक केला होता. तर हार्दिकही कुर्ता आणि धोतरमध्ये राजबिंडा दिसत होता. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये