देश - विदेशरणधुमाळी

हार्दिक पटेलांचा काॅंग्रेसला रामराम; भाजपात प्रवेश करणार का? म्हणाले…

गांधीनगर : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असतानाच आता गुजरातमधील तरुण नेता हार्दिक पटेलने काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यानंतर हार्दिक कोणत्या पक्षात प्रवेश करणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तसेच ते भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची देखील माहिती होती. त्यामुळे हार्दिक भाजपमध्ये जाणार का? याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. मी सध्या भाजपमध्ये जाणार नाही आणि जाण्याचा निर्णय देखील घेतलेला नाही, असं हार्दीक पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान पुढे ते म्हणाले, गुजरातमध्ये पाटीदार समाज असो वा अन्य कोणताही समाज, त्यांना काँग्रेसमध्ये त्रास सहन करावा लागला आहे. काँग्रेसमध्ये खरे बोलल्यानंतर बडे नेते तुमची बदनामी करतात आणि हीच त्यांची रणनिती आहे, असंही हार्दीक पटेल म्हणाले. ते अहमदाबादेत माध्यमांसोबत बोलत होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये