ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानांचा आपल्याला विसर पडला आहे का?’ – नितेश राणे

मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतील महाराष्ट्र कलादालनाच्या मुद्य्यावरून निशाणा साधला आहे. तसंच, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रसाठी बलिदान देणाऱ्यांचा विसर पसर पडला आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी नितेश राणे म्हणाले, “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिलं. पण या बलिदानांचा आपल्याला विसर पडला आहे का? हा प्रश्न आज विचारण्याची वेळ आलेली आहे. याचं कारण असं काही की शिवाजी पार्कवर जे संयुक्त महाराष्ट्राचं कलादालन जे उभारलेलं आहे, ते आज अंधारात आहे. कुठलीही विद्यूत रोषणाई आज केलेली नाही. गेल्या सहा महिन्यापासून स्थायी समितीने या कलादालनाला विद्यूत रोषणाई करावी यासाठी मान्य केलेला जो प्रस्ताव आहे. तो धूळ खात पडलेला आहे, त्यावर कुठलीही चर्चा झालेली नाही किंवा काम झालेलं नाही.”

“आपल्या फोटोग्राफीसाठी आपल्यला त्या कलादालनातील एक मजला आवडला आहे, असं आम्ही ऐकतोय. मग जसा जुना महापौर बंगला आज ठाकरेंची खासगी मालमत्ता झाली आहे, तसंच हे कलादालनही ठाकरेंची खासगी मालमत्ता तर होणार नाही ना? अशी भीती आज समस्त मराठी माणसांमध्ये आहे. आपला मुलगा राज्याचा पर्यटनमंत्री आहे. मग का नाही या कलादालनाला आपण महाराष्ट्र पर्यटन कॉपर्पोरेशनमध्ये सूचीत केलं?” असंही नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये