ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिवसेना-शिंदे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज झाला ‘हा’ मोठा निर्णय!

नवी दिल्ली : (Hearing on Shiv Sena-Shinde group petition) दोन महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना आमचीच असल्याचा दावा न्यायालयात शिंदे गटाकडून करण्यात येत आला. यापूर्वी शिवसेना-शिंदे गटाच्या या याचिकेवर शेवटची सुनावणी 4 ऑगस्टला पार पडली होती. त्यानंतर १२ ऑगस्ट आणि 22 अशी दोनदा ही सुनावणी पुढे ढकल्याण्यात आली होती.

या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी म्हणून शिवसेनेतर्फे सुभाष देसाई आणि अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती मान्य करत हे प्रकरण पटलावर घेण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आज पार पडली.

यावेळी महाराष्ट्रातील शिवसेना आणि ठाकरे गटाच्या वादावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाकडून आता पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यासाठी आता शिंदे गट आणि शिवसेनेच्या अस्तित्वाच्या सुनावणीचा नवा अध्याय गुरूवारपासून सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून या घटनापीठावर कोणत्या न्यायमुर्तींची नेमणूक केली जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये