पुण्यातील 29 वर्षीय महिलेच्या शरीरात धडधडले माजी सैनिकाचे हृदय
पुणे | भारतीय सैन्यदलात सेवेत असलेल्या सैनिकाच्या 29 वर्षीय पत्नीचे हृदय कमकुवत झाले होते. त्यामुळे दुसरे ह्रदय प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या महिलेला ’डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ हा आजार होता. तिच्यावर सहा महिन्यांपासून हृदयाला शॉक देणारे एक विशेष इंप्लांट बसवण्यात आले होते. मात्र शरीराला सरे ह्रदय प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नसल्याने त्या महिलेच्या शरीरात एका माजी सैनिकाचे हृदय बसवण्यात आले आहे.
रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेला अन् नंतर ब्रेन डेड झालेल्या मध्य प्रदेशातील भिंड येथील माजी सैनिकाच्या ह्रदयाचे प्रत्यारोपण शनिवारी पुणे येथे करण्यात आले. त्यासाठी विशेष विमान ह्रदय आणले गेले होते. या विशेष विमानासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. अवघ्या पाच तासात ही प्रक्रिया करण्यात आली. मग शस्त्रक्रियेनंतर पुणे येथील महिलेच्या ह्रदयात माजी सैनिकाच्या ह्रदयाची धकडन सुरु झाली. पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेसमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. अन् त्या 29 वर्षीय महिलेला पुन्हा नव्याने जीवदान मिळाले