दिल्लीतील एम्स रूग्णालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

AIIMS Hospital Fire – दिल्लीतील एम्स (AIIMS) रूग्णालयाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या संदर्भातली माहिती पीटीआयनं ट्विट करत दिली आहे.
पीटीआयनं ट्विट करत म्हटलं आहे की, दिल्लीतील एम्स रूग्णालयाला भीषण आग लागली आहे. तर एम्स रूग्णालयाच्या एंडोस्कोपी कक्षात आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत.
एम्स रूग्णालयाला सुमारे 11.54 च्या दरम्यान आग लागल्याची माहिती मिळत आहे. तर आता आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसंच रूग्णालयातील सर्व रूग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे असून दिलासादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.