घाटकोपरमध्ये पारेख रूग्णालयाच्या जवळील इमारतीला भीषण आग
मुंबई | Mumbai Fire News – घाटकोपरमध्ये (Ghatkopar) असलेल्या पारेख रूग्णालयाच्या (Parekh Hospital) जवळील इमारतीला भीषण आग (Fire) लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच या आगीत एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. पोरशी देढिया असं आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
पारेख रुग्णालयाच्या जवळील इमारतीला आग लागल्यानं या रूग्णालयातील रुग्णांना धुराचा त्रास होऊ नये म्हणून दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आलं आहे. तसंच घटनेची माहिती मिळताच अग्निशमदलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई अग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेनंतर 22 जखमींना पारेख रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना बाजूच्या राजेवाडी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबईत आगीच्या घटना सतत घडताना दिसत आहेत. परळ परिसरातील अविघ्न पार्क इमारतीला लागलेल्या आगीचे प्रकरण ताजं असतानाच आज (17 डिसेंबर) घाटकोपर येथील पारेख रूग्णालयाच्या शेजारील इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.