महाराष्ट्र

राज्यातील अनेक भागांत मुसळधार

मुंबई : यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली होती. दरम्यान, काल मान्सूनने अरबी समुद्रात प्रवेश केला असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वार्‍यांसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी १९ मे ते २१ मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारपासूनच काही ठिकाणी पावसाने रिपरिप सुरू केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातार्‍याच्या काही भागांत पाऊस झाला असून, पुण्यातल्या काही भागांतही तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या पावसामुळे शेतकर्‍यांची मात्र चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील या भागांत पाऊस सुरू असून, पावसाच्या नोंदीसंदर्भात भारतीय हवामान खात्याने माहिती दिली आहे . पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रदेशात पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये