पुढील पाच दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरू आहेत. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यात कोकणातील काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला होता.
राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्यानं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या पावसाच्या सरी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत कोसळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊसमान चांगला असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानुसार मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरू आहेत. मात्र या पावसाचा जोर कोकणातील प्रदेशावर आधिक असल्याचं चित्र आहे.