पुणेमहाराष्ट्रशेत -शिवार

‘ऊस गाळप राहिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाखाची मदत करा अन्यथा …’; मनसेचा आंदोलनचा इशारा

पुणे : राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न खूप गंभीर झाला असून ज्या शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्याने गाळपास नेला नाही अशा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपयाची मदत मिळावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्यासंबंधित मनसेकडून साखर आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.

मागणी मान्य नाही झाल्यास मनसेकडून महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिल आहे.

काय आहे पत्रात ?
महाराष्ट्र राज्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, हजारो शेतकऱ्यांचा लाखो टन उस गाळपाविना शेतातच पडून आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. शेतकरी हवालदिल झाले असून मानसिक तणावात जीवन जगत आहेत. अहोरात्र कष्ट करून ऊसाची चांगली जोपासना केली परंतु साखर कारखान्यानी ऊस नेला नाही. अनेक साखर कारखान्यांनी स्वतःच्या कार्यक्षेत्रातील ऊस न नेता कार्यक्षेत्राबाहेरील ऊस कमी पैशात मिळतो म्हणून गेट केन ऊस आणून गाळप केला आहे. ज्या ज्या साखर कारखाने स्वतःच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप केले नाही अशा साखर कारखान्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.
ऊस उत्पादक शेतकरी शेतातील ऊस गाळपास न गेल्याने चिंताग्रस्त होऊन हवालदिल होऊन आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून ऊसाची लागवड केली होती परंतु साखर कारखान्यांनी ऊस न नेल्यामुळे कर्जबाजारी झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतकरी नामदेव जाधव यांचा ऊस कोणत्याही कारखान्याने न नेल्यामुळे ऊस शेतातच होता. ऊस लागवडीसाठी खाजगी सावकाराकडून पैसे व्याजाने घेतल्यामुळे खाजगी सावकार लोक त्रास देत असल्यामुळे तणावात येऊन त्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील ऊस पेटवून देऊन शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न खूप मोठा गंभीर झाला आहे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी कृपया सरकारने ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपास गेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

दिलीप धोत्रे यांनी एक विडिओ जाहीर करत देखील ही माहिती प्रसारित केली आहे. त्यात त्यांनी सरकारला ऊस गाळपाविना शेतातच पडून राहिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये मदत करावी नाहीतर मनसेकडून तीवर आंदोलन करण्यात येईला असा इशारा दिला आहे.

नुकतीच मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाल्याशिवाय कोणतेही कारखाने बंद होणार नाहीत आणि 1 मे नंतर गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांना 200 रुपये प्रतिटन प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये