सरकार येताच खासदार भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांना जामीन!

मुंबई : (High Court granted bail Bhavana Gawali colleague) दि. ३० जुन रोजी बंडखोर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन केलं. अन् यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मिळाला. दि. ०२ रोजी उद्धव ठाकरे यांचे मेहुने श्रीधर पाटणकर यांना सीबीआयनकडून दिलासा मिळाला. हा योगायोग आहे का आणखी काही अशी जनसामान्यात चर्चा चालू आहेत.
दरम्यान, सईद खान यांना सप्टेंबर २०२१ मध्ये ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. याच प्रकरणात भावना गवळी या ईडीच्या रडारवर होत्या या प्रकरणाची खदखद त्यांनी काही दिवसांपुर्वी बोलून दाखवली होती. आणि भाजपसोबत सत्तास्थापन करण्याचं पत्रचं शिवसेना पक्षाला लिहीलं होतं. यामुळं आता संशयाला वाव मिळाला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. सोमय्यांनी वाशीमला येऊन पत्रकार परिषद घेत भावना गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला होता. शिवसेना खासदार भावना गवळी या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. याच महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे सईद खान हे संचालक आहेत. या संस्थेत 19 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप ईडीने सईद खान याच्यावर केला आणि यांची पावणेचार कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. या सर्व प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला आहे.