ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन वेरुळ लेणी पाहून भारावल्या; भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शेरा पुस्तिकेत केल्या नोंदी

औरंगाबाद | युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या (USA) परराष्ट्र मंत्री तथा 1993 ते 2003 काळात अमेरिकेच्या प्रथम महिला म्हणून कार्यरत राहिलेल्या हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) या 7 ते 9 फेब्रुवारी, अशा दोन दिवसांच्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर होत्या. याच दौऱ्यात त्यांनी वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिराला भेट दिली. हिलरी क्लिंटन यांनी वेरुळ लेणी पाहिल्यानंतर आपल्या भावना भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शेरा पुस्तिकेत बुधवारी नोंदवल्या. त्यांनी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत वेरुळ लेणीमधील ‘कैलास’ ही 16 क्रमांकाची लेणी, तसेच इतर बौद्ध, जैन लेणींचे शिल्पसौंदर्य अनुभवले.

वेरुळ लेणीमधील कैलास लेणीसह इतर सर्व लेणींची माहिती त्यांना भारतीय पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितली. अहमदाबादहून हिलरी क्लिंटन खासगी विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर त्यांनी खुलताबाद येथील शहाजतपूर येथील ध्यान फार्मस् येथे मुक्काम केला. वेरुळ लेणीमधील सर्वप्रकारची शिल्पे त्यांना दाखविण्यात आली.

‘काय अद्भूत ऐतिहासिक स्थळ आहे आणि ते मला आणि जगाला दाखविल्याबद्दल धन्यवाद’ या शब्दात हिलरी क्लिंटन यांनी वेरुळ लेणी पाहिल्यानंतर आपल्या भावना भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शेरा पुस्तिकेत बुधवारी नोंदवल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये