ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

हिंदू जन आक्रोश काढताय मग अपयश कोणाचं? मोदींकडे बोट दाखवत शिवसेनेचा सवाल!

मुंबई : (Hindu Jan Aakrosh Morcha) मागील काही महिन्यापासून ‘लव जिहाद’चा मुद्दा भाजप नेत्यांनी ऐरणीवर आणला आहे. त्या पार्श्वभुमीवर आज लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या या मोर्चाला हिंदू समाज बांधवांनी देखील उत्फूर्त प्रतिसाद दिला.

दरम्यान, या मोर्चाचे नेतृत्त्व भाजपच्या नेत्यांनी केल्याचे पाहायला मिळाले. देशात आणि राज्यात त्यांचेच सरकार असताना हा मोर्चा नेमका कोणाला विरोध करण्यासाठी काढला होता हा मुद्दा समोर येत आहे. मोर्चात भाजपसह शिंदे गटाचे आमदार, पदाधिकारी, नेते उपस्थित आहेत. यामध्ये भाजपचे प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, आशिष शेलार, केशव उपाध्ये आणि चित्रा वाघ या मोर्चात सहभागी झाले होते.

त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) एका ट्विटमध्ये भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हणाले की,”शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे हे आक्रोश मोर्चाने सिध्द केले.आठ वर्षापासून शक्तिमान हिंदू नेत्यांचे राज्य असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे अपयश कोणाचे काश्मिरात पंडितांचा आक्रोश, करसेवकाच्या हत्या करणाऱ्या, मौ.मुलायम यांना पद्मविभूषण, हिंदू आक्रोश करणारच!”. असं ट्विट त्यांनी केले आहे.

आगामी काळात होवू घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला महत्त्वा प्राप्त झालं आहे. दोन्हीकडे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना त्यांनी मोर्चा का काढवा लागती असा प्रश्न सामान्य नागरीकांना नक्की पडल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये