ताज्या बातम्यामुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

“देशातील कोणत्याही व्यक्तीची चौकशी…”,राऊतांवरील ईडी कारवाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया

बीड | Ajit Pawar’s Reaction On ED Action On Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीचं पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथकं आज (31 जुलै) सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याबाहेरच ईडीविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. तर दुसरीकडे यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राऊतांवरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले, “मागील काळात अनेकांना ईडीच्या नोटीसा आल्या होत्या. वेगवेगळ्या संस्थांना स्वायत्ता दिलीय आणि चौकशीचे अधिकार देण्यात आले आहेत. यात आयकर विभाग (IT), ईडी, सीबीआय, राज्य सरकारच्या एसीबी, सीआयडी, पोलीस, गुन्हे शाखा यांचा समावेश आहे. या संस्थांकडे काही तक्रारी आल्या तर त्यांना चौकशी करण्याचा अधिकार आहे.”

“संजय राऊतांच्या प्रकरणात नेमकं काय झालं आहे, त्यांच्याकडे सारखंसारखं का येत आहेत याविषयी जास्त अधिकारवाणीने संजय राऊतच बोलू शकतील,” असंही अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये