पाकिस्तानमध्ये श्रद्धा वालकरपेक्षाही भयानक हत्याकांड, हिंदू महिलेचे शीर आणि स्तन कापून फेकले
इस्लामाबाद | सध्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. अशातच पाकिस्तानमधील सिंझोरो शहरात एका महिलेची अमानूषपणे हत्या करण्यात आली आहे. 40 वर्षीय महिलेचा शिरच्छेद करण्यात आला आहे. तर तिचे स्तनही कापून टाकण्यात आले आहेत. याबाबतची माहिती पाकिस्तानमधील पहिल्या महिला हिंदू खासदार कृष्णा कुमारी (Krishna Kumari) यांनी दिली आहे.
कृष्णा कुमारी यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. “40 वर्षीय विधवा दया यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तसंच त्यांचा मृतदेह वाईट अवस्थेत आढळला आहे. त्यांचे शीर वेगळे करण्यात आले होते आणि रानटी लोकांनी संपूर्ण डोक्याचे मांस काढून टाकले होते. मी त्यांच्या गावाला भेट दिली आहे. तिथे पोलिसांची पथकही पोहोचली आहेत.”
दरम्यान, बुधवारी (28 डिसेंबर) पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेत्यानं शेतात मृतदेह सापडला असल्याची माहिती दिली. तसंच पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाकडून माहिती गोळी केली असल्याचं म्हटलं आहे. तर शवविच्छेदन करण्यात आलं असून पुढील तपास सुरु असल्याचंही या नेत्यानं सांगितलं आहे.