आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी गृहमंत्री अमित शाह लावणार हजेरी, सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
अहमदाबाद | IPL 2022 | इंडियन प्रिमीअर लीगचा (IPL) रोमांच आता अंतिम (Final) टप्प्यात पोहचला आहे. आज (रविवार) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि राजस्थान रॅायल्स (Rajsthan Royals) या दोन संघात अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये (Narendra Modi Stadium) पार पडणार आहे. तसंच या सामन्याला अनेक सिने कलाकार हजेरी लावण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारताचे गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह (Home Minister Amit Shaha) देखील हा सामना पाहायला स्टेडियमध्ये जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदाबाद (Ahamdabad) शहरात पोलिसांचा (Police Security) मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
अहमदाबाद शहराचे पोलीस आयुक्त संजय श्रीवास्तव (Sanjay Shriwastav) यांनी इंडीयन एक्सप्रेसला सांगितलं की, येत्या काळात अहमदाबाद शहरात आणि स्टेडियम परिसरात १७ डीसीपी, ४ डीआयजीएस, २८ एसीपी, ५१ पोलीस निरीक्षक, २६८ पोलीस उपनिरीक्षक, ५०० हून अधिक पोलीस शिपाई, १००० होमगार्ड आणि एसआरपीच्या तीन कंपन्या बंदोबस्ताचा भाग असतील.
अमित शाह २८ मे पासून गुजरात दौऱ्यावर असून राज्यातील विविध उपक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत. दरम्यान ते दोन मंत्र्यांसोबत काही VIP लोक आणि बॉलीवूड सुपरस्टार यांच्यासमवेत IPL 2022 च्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.