विविध क्षेत्रातील ५०कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पुणे : कुटुंब सांभाळून काम करताना महिलांची तारेवरची कसरत होते. अशा महिला समाजात कर्तृत्व गाजवतात तेव्हा त्या इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि आदर्श असतात. अश्या व्यक्तींचा सन्मान म्हणजे एकप्रकारे राष्ट्रनिर्मितीचे कार्यच आहे. महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक करणारे कार्यक्रम नेहमीच व्हायला हवेत, असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या कुटुंबासाठी हातभार लावणाऱ्या ५० महिलांचा सन्मान भाजपा एनजीओ आघाडीच्या वतीने करण्यात आला.
शिरोळे रस्त्यावरील सुदर्शन हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुवर्णा निंबाळकर म्हणाल्या, आपल्या इतिहासाची पाने चाळल्यास लक्षात येईल की अनेक कर्तृत्ववान महिलांचा इतिहास आपल्याला माहिती नाही. असा प्रेरणादायी इतिहास पुढे आल्यामुळे महिलांना त्यांच्या कार्यातून नवी ऊर्जा मिळेल.