Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्रस्टार्ट अप

एएफपीएलच्या सेवांना फायदा

पुणे : कनेक्टिव्हिटी आणि क्लाऊड सोल्यूशन्सच्या क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य बी२बी तंत्रज्ञान क्षमता पुरविणारी कंपनी टाटा टेलि बिझिनेस सर्विसेसने स्मार्टफ्लो या क्लाऊड कम्युनिकेशनचा विस्तार आनंद प्रॉपर्टी फायनांस लिमिटेडपर्यंत करण्यात आला आहे. स्मार्टफ्लोमुळे एएफपीएलला सतत येणाऱ्या एजंटशी कॉल राऊटिंग करणे व ग्राहकांशी अखंड संवाद साधणे शक्य झाले.

तसेच त्याद्वारे कोठूनही आणि कोणत्याही उपकरणावरून सुरक्षितपणे कॉल घेणे व करणे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शक्य झाले. कोणताही सिग्नल कॉल मिस न होणे, एजंटांची कार्यक्षमता वाढणे, सर्वसमावेशक विश्लेषण आणि अखंडपणे दर्जावर लक्ष ठेवणे असे सकारात्मक प्रतिसाद त्यातून मिळाले. त्वरित सेट अप आणि कॅपेक्ससाठी गुंतवणूक नसणे या वैशिष्ट्यांसोबतच स्मार्टफ्लो सोल्यूशन ९९.५ टक्के एवढ्या अपटाईमची हमी देते.

स्मार्टफ्लो प्लॅटफॉर्मच्या क्लाउड-आधारित कम्युनिकेशन सोल्यूशन्सच्या स्मार्ट, लवचिक, सुरक्षित आणि विश्वासार्ह सूटमुळे व्यवसायांना आपल्या कामकाजाच्या पद्धतीचा पुनर्विचार करण्यास मदत मिळते. सध्याच्या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी व्यवसाय आपल्या कामकाजाच्या पद्धतीची पुनर्रचना करत आहे. ते पुनर्रचना करत पूरेपूर फायदा घेत आहेत.
— मन्नू सिंह, टाटा टेलिसर्व्हिसेसचे उपाध्यक्ष

स्मार्टफ्लोच्या प्रगत क्षमतांमुळे एएफपीएलकडे येणाऱ्या आणि आपल्याकडून जाणाऱ्या कॉलचे सुसूत्रीकरण करून त्यांचे अधिक चांगल्या प्रकारे निरीक्षण व नियंत्रण करणे त्यांना शक्य झाले.

स्मार्टफ्लो सोल्यूशनची वैशिष्ट्ये

  • ग्राहकांच्या कॉलची सर्वोत्तम एजंट/कर्मचाऱ्यांकडे पाठवणी
  • किवर्क मॅपिंगच्या माध्यमातून आवाजाचे मजकूरात (व्हॉईस टू टेक्स्ट) रूपांतर
  • ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी कॉल सेंटिमेंट ॲनालिसिस
  • ग्राहकांची एकाच ठिकाणी माहिती घेण्यासाठी सर्व उद्योग ॲप्लिकेशनचे एपीआय एकत्रीकरण
  • लाईव्ह कॉल बार्ज-इनच्या माध्यमातून ग्राहकांशी संवादाची दर्जा चाचपणी
  • अधिक खोल माहिती मिळवून व्यावसायिक संपर्क वाढविण्यासाठी ॲनालिटिक्स आणि रिपोर्ट्स
  • अतिरिक्त कॅपेक्स नसतानाही मागणीनुसार लवचिकता
  • उद्योगाच्या पातळीची अंतर्गत सुरक्षा व विश्वासार्हता

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये