ट्राईबतर्फे वाकडला अत्याधुनिक वसतिगृह

विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीचा प्रयत्न : योगेश मेहरा
पुणे : ‘शिक्षणासाठी आपले घर, शहर सोडून इतर ठिकाणी जाणार्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषतः राहण्याच्या ठिकाणाबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी असतात. योग्य सुविधांच्या अभावामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रभाव होतो. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेत, त्यादृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत ट्राईब वसतिगृहाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश मेहरा यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करून देणार्या ‘ट्राईब’तर्फे वाकड येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक वसतिगृहाबाबत माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘ट्राईब’चे सह-संस्थापक शान्तम मेहरा उपस्थित होते.
योगेश मेहरा म्हणाले, ‘देशात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी योग्य सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या जागा नाही. अनेकदा त्यांना वीजेची समस्या, अस्वच्छता, खाद्यपदार्थ, दैनंदिन कामांमधील अडचणी अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याशिवाय अनेक छोट्या गोष्टींमुळे खर्चही वाढतो.
विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेश पायाभूत सुविधांची निर्मिती आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत आपल्याकडील बांधकाम व्यवसाय क्षेत्रात याबाबत फारसा विचार झाला नव्हता. मात्र आता परिस्थिती बदलली असून, विद्यार्थी वसतिगृहांच्या निर्मितीसाठी अनेक बांधकाम व्यावसायिक पुढाकार घेत आहेत. पुढील काही वर्षांत या क्षेत्रात गुंतवणूकीचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा आहे.
वाकड येथे उभारण्यात आलेल्या आधुनिक ‘ट्राईब’ वसतिगृहात २१० पूर्ण वातानुकूलित खोल्या आहेत. अतिशय बारकाईने आणि काळजीपूर्वक रचना करण्यात आली आहे. या वसतिगृहाच्या इन-हाऊस कॅफेमध्ये जागतिक दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. व्यावसायिकरित्या सुरक्षिततेसाठी सुरक्षायंत्रणा, ‘की-लेस’ अर्थात चावीविरहित आणि ‘कॅशलेस कॅम्पस’, अमर्यादित स्वरूपात हाऊसकीपिंग, लाँड्री सुविधा, विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक फिटनेस सेंटर उपलब्ध असेल, तसेच विद्यार्थ्यांसाठी वर्षभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर देशभरात अशाप्रकारचे वसतिगृह विकसित करण्याचा मानस आहे, असे योगेश मेहरा म्हणाले.