ईडी कारावायांबाबत आधी कसं कळतं?, किरीट सोमय्यांनी केला खुलासा;म्हणाले …

मुंबई : Kirit Somaiya On ED भाजप आणि शिवसेना नेते एकमेकांवर टीका टिपणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असून सध्या शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब(Anil Parab) यांच्या मुंबईतील निवासस्थानवर ईडीने छापा मारला आहे. यामुळे राजकीय वातावरण अजूनच तापलं आहे. शिवसेनेकडून सतत भाजपवर ईडी(ED) प्रकरणावरून आरोप केले जातात. तर भाजपकडूनही(BJP) उत्तर दिल जातं असल्याचं पाहायला मिळत. भाजप नेते किरीट(Kirit Somaiya) सोमय्या यांच्यावर सतत आरोप केला जातो की, सोमय्यांना ईडी कारवाई करते हे सर्वात आधी कसं कळत. त्यावर आता सोमय्यांनी स्वतः उत्तर दिल आहे.
तसंच याआधी देखील अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी(ED) आणि आयकर विभागाने कारवाई केल्या आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सोमय्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सोमय्या म्हणाले की,“जेव्हा तक्रार दाखल करण्यात येते तेव्हा सुनावणीदरम्यान कमिटमेंट मिळते. मी या प्रकरणात पूर्णपणे लक्ष घातलेलं असतं. त्यामुळे मला हे लगेच समजू शकतं’. याचबरोबर जर आपण बघितलं तर लक्ष्यात येईल की,अनिल परब(Anil Parab) यांनी चौकशीत शून्य रुपये गेल्याचे सांगितलं होतं आणि जेव्हा परब यांच्या विरोधात दापोली कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली. ती तक्रार जर आपण नीट वाचुन बघितली तर लक्ष्यात येईल की, तक्रारीत बनावट कागदपत्रे, फसवणूक असं भारत सरकारने लिहिलेलं आहे. पण जेव्हा आयकर विभगाची धाड पडली तेव्हा सदानंद कदम यांच्या ऑडिटरने लिखित स्वरुपात जबाब दिला की सात कोटी रुपये सदानंद कदम यांच्या अकाऊंटमधून गेले आहेत. असं किरीट सोमय्यानी(Kirit Somaiya) सांगितलं.
दरम्यान, सोमय्या यांनी स्पष्टीकरण दिलं की,“ईडी असो किंवा आयकर विभाग मीही या सर्वांचा अभ्यास करत असतो यासाठी मला तुरुंगात जावं लागलं तरी चालेल. तसंच महाराष्ट्रातील जनतेला कोण अगोदर सांगतंय कोण नंतर सांगतंय याबद्दल काही देणघेणं नाही.असं देखील सोमय्या म्हणाले.