टेक गॅझेटताज्या बातम्यामनोरंजन

व्हॉटसअ‍ॅपवरील Video Call रेकाॅर्ड करण्यासाठी जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

मुंबई | What’s App Video Call Record – व्हॉटसअ‍ॅपचा (What’s App) नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉटसअ‍ॅपमध्ये मेसेज, काॅल, व्हिडीओ काॅल अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. सर्वजण व्हॉटसअ‍ॅपवरून संवाद साधण्याला चांगलंच प्राधान्य देतात. तसंच व्हॉटसअ‍ॅपकडुनही युजर्सना आकर्षित करण्यासाठी नेहमी नवनवीन फीचर लाँच केले जातात. त्यातच व्हॉटसअ‍ॅपवरील व्हिडीओ काॅल रेकाॅर्ड (Video Call Record) कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर आपण हा व्हिडीओ काॅल नक्की कसा रेकाॅर्ड करायचा याच्या सोप्या स्टेप्स जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही अँड्राॅइड फोन (Android Phone) वापरत असाल तर सर्वात आधी तुम्हाला X Recorder अ‍ॅप वापरून तुम्ही व्हॉटसअ‍ॅपवरील व्हिडीओ काॅल रेकाॅर्ड करू शकता. X Recorder हे अ‍ॅप डाउनलोड करा आणि आवश्यक ती परवानगी द्या. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर व्हिडीओ रेकाॅर्डींगचा पर्याय दिसेल याच्या मदतीनं तुम्ही व्हॉटसअ‍ॅपवरील व्हिडीओ काॅल रेकाॅर्ड करू शकता.

तसंच आयफोन युजर्ससाठी (iPhone Users) व्हॉटसअ‍ॅप काॅल रेकाॅर्ड करणं अगदी सोप्पं आहे. सगळ्यात आधी व्हिडीओ काॅल सुरू करा. त्यानंतर खाली असणाऱ्या स्वाइप बटणावर क्लिक करा. मग सेटिंग्ज पर्यायामधील ‘कंट्रोल सेंटर’ हा पर्याय निवडा. तिथे तुम्हाला स्क्रिन रेकाॅर्ड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडीओ काॅल रेकाॅर्ड करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये