पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

‘उगवते तारे’ रौप्यमहोत्सवात १५० बाल कलाकारांचा सहभाग

पुणे : उगवत्या व नवोदित कलाकारांसाठी पुणे फेस्टिव्हलमध्ये दर वर्षी ‘उगवते तारे’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये मंगळवारी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, पुणे येथे झालेल्या उगवते तारे कार्यक्रमाचे उद्‌घाटन ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर यांच्या हस्ते झाले. यंदा उपक्रमाचे २५ वे वर्ष आहे.

रवींद्र दुर्वे याचे संयोजन करीत आहे. ५ ते १५ वर्षे वयोगटातील उगवत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या कार्यक्रमात यंदा १५० हून अधिक बाल कलाकारांनी सहभाग घेतला. शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्यामध्ये; कथक, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली, कुचीपुडी व ओडिसी नृत्य तसेच तबला, बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलीन, सतार, सरोद, कीबोर्ड वादन, सिंथेसायझर, गंधर्व गायन, नकला, एकपात्री प्रयोग, जादूचे प्रयोग, पोवाडे, भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीते, सुगम संगीत, पाश्चिमात्य नृत्य अशा वैविध्यपूर्ण कला प्रकारांनी सारे भवन भारून गेले होते. प्रारंभी उगवते तारे कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र दुर्वे यांनी सर्वांचे स्वागत केले. उद्घाटक डॉ. स्वाती दैठणकर यांनी बाल कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये