ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

हंटर बायडेन दोषी; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मुलावर ‘या’ गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्याविरोधात बेकायदेशीर अमली पदार्थ वापरत असताना बंदूक खरेदी केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. युनायटेड स्टेट्समध्ये बंदूक वापरण्यास परवानगी असली तरी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना अशी परवानगी दिली जात नाही. विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या मुलावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणे, ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. हंटर बायडेन यांच्यावर अमेरिकेच्या डेलवेअर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

हंटर बायडेन यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे विरोधात असलेल्या रिपब्लिकन पक्षाला आयताच विषय मिळाला आहे. हंटर बायडेन यांच्याशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासोबतच राष्ट्राध्यक्ष जो बायेडन यांच्याविरोधातही महाभियोग चालवावा, अशी मागणी रिपब्लिकनकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या दाव्यानुसार, राष्ट्राध्यक्ष आपल्या मुलाच्या व्यवसायात गुंतलेले असून त्यांनी सरकारमधील आपल्या पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर केला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एक वर्षाचा कालावधी बाकी असताना या नवीन हालचालीचा निवडणुकीवर काय परिणाम होणार? याबाबत अमेरिकेत जोरदार चर्चा होत आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मुलाने कोकेन या अमली पदार्थाचे व्यसन करत असल्याचे मान्य केले होते, तसेच व्यसनाधीनतेच्या काळात त्यांनी शस्त्रखरेदी (हँड गन) केली. वकील आणि व्यावसायिक असलेल्या हंटर बायडेन यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०१८ साली जेव्हा त्यांनी शस्त्र खरेदीसाठी आवश्यक असलेला अर्ज भरला होता, तेव्हा ते अमली पदार्थाचे सेवन करत नव्हते. अमेरिकेत शस्त्रखरेदी करताना अमली पदार्थाच्या सेवनाबाबत खरी माहिती द्यावी लागते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये