अखेर सलमान खान ‘त्या’ ब्रेकअपबाबत बोलला; म्हणाला, “प्रेमाच्याबाबतीत मी…”
मुंबई | Salman Khan – बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खानच्या या चित्रपटानं बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तसंच सलमान चित्रपटांसोबतच तो त्याच्या लव्ह लाईमुळेही नेहमी चर्चेत असतो. सलमानचं ऐश्वर्या रायसोबतचं अफेअर आणि ब्रेकअप चांगलंच गाजलं होतं. त्यानंतरचेही त्याचे अनेक अफेअर गाजले आहेत. अशातच सलमाननं नुकतंच रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात त्याच्या ब्रेकअपबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
‘आप की अदालत’ या कार्यक्रमात रजत शर्मा यांनी सलमान खानला त्याच्या अफेअर्सवरून प्रश्न विचारला. यावर सलमाननंही मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे. रजत शर्मा यांनी ट्रेलर लाँचच्या वेळी सलमानला त्याच्या ‘मूव्ह ऑन’ कमेंटबद्दल प्रश्न विचारला होता. जे तुमचं मुव्ह ऑन होत आहे म्हणजे तुम्ही एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे असं जाताना दिसत आहात त्यावर काय सांगाल. या प्रश्नावर सलमान हसत म्हणाला, “मी प्रेमाच्याबाबतीत फारच कमनशीबी आहे.”
पुढे रजत शर्मा यांनी सध्या तुझी प्रेयसी कोण आहे? असा प्रश्न सलमानला विचारला. त्यावर सलमान म्हणाला, “मी सध्या फक्त एक भाऊ आहे. ज्यांना मी जान म्हणत होतो त्याच आता मला भाई म्हणत आहेत. त्यामुळे मी काय करू?”, सलमानचं हे उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो.