ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शरद पवारांची फिरकी; सकाळी एक तर दुपारी दुसरंच, म्हणाले, अजित पवार आमचे नेते आहेत असं मी…

सातारा | Sharad Pawar – आज (25 ऑगस्ट) सकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांबाबत (Ajit Pawar) मोठं वक्तव्य केलं होतं. अजित पवार हे आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तर राष्ट्रवादीत कोणतीही फुट नसल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं होतं. आधी सुप्रिया सुळे आणि नंतर शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर संभ्रम निर्माण झाला आहे.

शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी साताऱ्यात अजित पवारांबाबतच्या वक्तव्यावर भाष्य केलं. तसंच सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी संदर्भ दिला. यावेळी शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे आमचे नेते आहेत, असं मी म्हणालोच नाही. सुप्रिया अजित पवारांची धाकची बहिण आहे. त्यामुळे बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.

एखादा मोठा गट फुटला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटे शपथविधी झाला त्यावेळी त्यांना आम्ही संधी दिली. पण आता परत संधी द्यायची नसते आणि मागायचीही नसते, असंही शरद पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये