ताज्या बातम्यारणधुमाळी

‘मला वाटलं एकच व्यक्ती गाते’ उद्धव ठाकरेंनी टोला लगावल्यानंतर अमृता फडणवीसांनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

मुंबई : सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. तसंच १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या वेबसंवादात सहभागी होत टीका केली आहे. सोबतच त्यांनी महाउत्सव कार्यक्रमात सहभागी होत आनंद लुटला. यादरम्यान बोलताना त्यांनी अमृता फडणवीसांचा उल्लेख न करता टोला लगावला होता. त्यावर आता अमृता फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

राज्यातील विविध अधिकाऱ्यांनी आपली कला सादर करावी, यासाठी राज्य सरकारने महाउत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाक पोलीस कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचाऱ्यासोबत आयएएस अधिकाऱ्यांनी आपली कला मंचावर सादर केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीसांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. “राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यनं सांगितलं होतं. मला धक्का होता, मला वाटलं होतं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, पण बाकीचे सुद्धा गातात,” असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे. “मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा आब्जाधीशच आहे ! छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात,” असं अमृता फडणवीस यांनी खोचक शब्दांत म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये