ताज्या बातम्यामनोरंजन

“मी गांजाचं सेवन केलं होतं”; आर्यन खानने NCB कडे केला मोठा खुलासा

मुंबई | Aryan Khan Drugs Case | बॅालिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Actor Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने (NCB) मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) क्लीन चिट (Clean Cheat) दिली आहे. एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि महककडे ड्रग्ज सापडलं नव्हतं. पण आर्यनने चौकशी दरम्यान कबूल केले होते की तो अमेरिकेत शिकत असताना गांज्याचे सेवन करत होता. (Aryan Khan Drugs Case)

आता एनसीबीच्या आरोपपत्रात असं समोर आलं आहे की, “२०१८मध्ये अमेरिकेत शिकत असताना आर्यन गांज्याचे सेवन करत होता. त्याला स्लीपिंग डिसऑर्डर असल्यामुळे गांज्याचे सेवन केल्याचं आर्यन म्हणाला होता. याव्यतिरिक्त त्याने सांगितले की इंटरनेटवर असलेल्या काही आर्टिकल्समध्ये त्याने वाचले की स्लीपिंग डिसऑर्डरसाठी गांजा उपयुक्त आहे.” तसंच एनसीबीने म्हटलं आहे की, “आर्यन खानने दुसर्‍या एका निवेदनात कबूल केलं की त्याच्या फोनमध्ये सापडलेले व्हॉट्सअॅप ड्रग चॅट हे त्याने केले होते.”

दरम्यान, एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांना पुरावे न मिळाल्याने क्लिन चीट देताना या प्रकरणातील घटनाक्रमाची माहितीही दिली आहे. याप्रमाणे, एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन, अरबाज, इशमत आणि गोमितला इंटरनॅशनल पोर्ट टर्मिनल येथून ताब्यात घेतलं होतं. नुपूर, मोहक आणि मुनमुनला कोर्डिला क्रुझवरून ताब्यात घेण्यात आलं. यापैकी आर्यन आणि मोहक वगळता सर्वांकडे ड्रग्ज सापडले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये