महाराष्ट्ररणधुमाळी

“… सुधीर मुनगंटीवारांना हार घालेन;” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य!

कऱ्हाड : Prithviraj Chavan On Sudhir Mungantiwar | कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी राज्यसभा निवडणुकीत उभं राहणार नसल्याची घोषणा केली आहे. तसंच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackaray)यांच्यावर आरोप देखील केला आहे. त्याचबरोबर भाजप (BJP) आणि महाविकास आघडीवरही संभाजीराजे यांनी निशाणा साधला आहे. त्यावर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला असून भाजपच्या सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत काॅंग्रेसची (Congress) भूमिका स्पष्ट करत म्हटलं की, संभाजीराजेंना राज्यसभेमध्ये अपक्ष पाठिंबा देण्याचा प्रश्न हा प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक असून जे सतत महाविकास आधाडीवर आरोप करतात ते भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी स्वतः च्या पक्षाच्या कोट्यातून अपक्ष म्हणून संभाजीराजेंना तिकीट दिलं तर मी त्यांचं स्वागत करेल. इतकंच नाही तर सुधीर मुनगंटीवार यांना हार घालेन, असं विधान चव्हाण यांनी केलं आहे.

दरम्यान, आमदार चव्हाण म्हणाले की,लवकरच राज्यसभेमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेली जागा जाहीर होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्षाला 2 जागा असून त्याचा निर्णय तो पक्ष घेईल. तसंच राष्ट्रवादी पक्षाला 1 जागा आहे. यामुळे प्रत्येक पक्ष आपआपला निर्णय घेईलतो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जर संभाजीराजेंना अपक्ष निवडणूक लढायची असेल तर भाजपने त्यांना पाठींबा द्यावा असं आवाहन देखील चव्हाण यांनी त्यावेळी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये