एका पराभव अन् स्वप्न भंगल! श्रीलंकेची विश्वचषकातील ‘थेट एन्ट्री’ हुकली!

ICC Cricket World Cup 2023 : भारतामध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात (ICC Cricket World Cup 2023) थेट प्रवेश मिळण्याचे श्रीलंकेचं स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडविरोधातील मानहानीकारक पराभव झाल्यानंतर श्रीलंका विश्वचषकात थेट प्रवेश मिळण्यापासून वंचित राहिली आहे. त्यामुळे हा श्रीलंकेला मोठा धक्का मानला जात आहे.
न्यूझीलंड आणि श्रीलंका (New Zealand vs Sri Lanka) यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका पार पडली. अखेरच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने (NZ vs SL 3rd ODI) श्रीलंकेचा पराभव केला. यासह तीन सामन्याची मालिका 2-0 च्या फराकाने जिंकली. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. या मालिकेत 2-0 ने पराभव झाल्यामुळे श्रीलंकेचे विश्वचषकात थेट क्वालिफाय होण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता श्रीलंकेला मोठी मेहनत करून विश्वचषकात क्वालिफायमध्ये जाण्याची संधी असणार आहे.
वर्ल्डकप 2023 मध्ये दहा संघ खेळणार आहेत. आतापर्यंत सात संघाने क्वालिफाय केलंय. वर्ल्ड कप 2023 साठी सुपर लीग अंतर्गत गुणतालिकेतील आघाडीचे आठ संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. श्रीलंका संघ सध्या नवव्या क्रमांकावर आहे. त्यामुळं ते थेट प्रवेशाला मुकले आहेत. भारत, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगानिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी विश्वचषकात थेट क्वालिफाय केलंय. श्रीलंका संघाला विश्वचषकात थेट प्रवेश मिळाला नाही, पण त्यांच्याकडे अद्याप संधी आहे.