संधी मिळाल्यास गुलाबराव पाटील जाणार बिग बाॅसमध्येही, पुन्हा चर्चेला उधाण
जळगाव | Gulabrao Patil – शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे पुन्हा एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. “बिग बाॅसमध्ये (Bigg Boss Marathi) बोलावलं तर नक्की जाऊ. बिग बाॅसमध्ये जाणं ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल”, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, मला असं वाटतं की गुलाबराव पाटलाला बिग बाॅसमध्ये कोणी बोलावत असेल आणि अशी संधी जर मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण होतेय. शालेय तसंच महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये म्हणा, गाण्यांमध्ये म्हणा मी भाग घ्यायचो. त्यामुळे बिग बाॅसमध्ये बोलावलं तर ही सोन्यासारखी संधी आहे, मिळाली तर निश्चितपणाने जाऊ.
दरम्यान, मराठी बिग बाॅस होस्ट करणारे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांना नुकताच प्रश्न विचारण्यात आला होता की, राजकारणातील कोणकोणते चेहरे तुम्हाला बिग बाॅसमध्ये पाहायला आवडतील. त्यावर महेश मांजरेकरांनी गुलाबराव पाटील यांचं नाव घेतलं होतं.