Top 5देश - विदेश

सरकार पडलं तर भाजपसोबत जाणार का?; शरद पवार म्हणाले…

नवी दिल्ली – Sharad pawar on Eknath Shinde | राज्यात सध्या राजकीय भूकंप झाला असून शिवसेवेने कट्टर मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. या सर्व घटनेमुळे महाविकास आघाडी धोक्यात आली आहे. अशातच यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहाता यातून काही ना काही मार्ग निघेल, असा मला विश्वास आहे. आत्तापर्यंत शिंदेंनी आम्हाला किंवा इतर कुणाला त्यांचा प्रस्ताव सांगितला नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी, जर सरकार कोसळलं तर भाजपसोबत जाणार का?, असा सवाल पवारांना करण्यात आला.

दरम्यान, काहीतरी व्यवस्थित प्रश्न तरी विचारा. काहीही प्रश्न विचाराल का? राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबतच का जाईल?, विरोधात देखील बसू शकते, असं शरद पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये