महाराष्ट्रमुंबई

मंकीपॉक्स आजाराबाबत राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले…

मुंबई – Rajesh Tope on Monkeypox | कोरोना (Corona) महामारीने संपुर्ण जगावर मोठं संकट आलं होतं. आता कुठे सर्व देश पुन्हा उभारी घेताना दिसत आहेत. मात्र अशातच आता एका नव्या आजाराने डोकं वर काढलं आहे. मंकीपॉक्स (Monkeypox) असं आजराचं नाव आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) या आजाराचे मोठ्या प्रमाणावर रूग्ण सापडले आहेत.

या आजाराचे भारतात रूग्ण आहेत का?, भारतात मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे की नाही याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री (Health Minister Rajesh Tope) राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आपल्या देशात मंकीपॉक्स या आजाराचा अद्याप शिरकाव झाला नाही. माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरत असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

मंकीपॉक्सची लक्षणे- (Symptoms Of Monkeypox)
पुरळ येणे, ताप येणे ही आजाराची लक्षणे असून जवळपास 2 ते 4 आठवडे हा आजार राहू शकतो. त्यामुळे जर अशी काही लक्षणे आढळली तर तपासणी करून घ्यावी, असंं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये