वर्ल्ड कप कसा जिंकायचा? रोहितच्या उपस्थितीत BCCI चा प्लॅन तयार!

मुंबई : (Important meeting BCCI) टीम इंडियाने 2022 मध्ये पुन्हा एकदा टि-20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावली, त्यासोबतच इतर काही अडचणींचा सामना क्रिकटे बोर्ड आणि संघाला करावा लागला. या सगळ्या पार्श्वभुमीवर बीसीसीआयमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये टीम इंडियाची कामगिरी, रोडमॅप आणि इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे नवीन वर्ष सुरू होताच भारतीय क्रिकेट संघ पुढील आव्हानांसाठी सज्ज झाला आहे.
मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मुख्य चीफ सलेक्टर शर्मा उपस्थित होते. या बैठकीत टीम इंडियाची 2022 मधील कामगिरी, 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवावर चर्चा झाली. यासोबतच एकदिवसीय विश्वचषक 2023 साठीचा रोडमॅपही तयार करण्यात आला आहे.
टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर 2022 साली आशिया कप आणि T20 वर्ल्डकपमध्ये पराभव पत्करावा लागला होता, तर परदेशी भूमीवर कसोटी सामने हरले होते. आता 2023 मध्येही टीम इंडियाला आशिया कप खेळायचा आहे आणि 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकही होणार आहे. त्यामुळे आतापासूनच भारतीय क्रिकेट संघ कामाला लागला आहे.