ताज्या बातम्यामनोरंजन

‘बिग बाॅस’च्या घरात शिव ठाकरेला तरूणींनं घातली लग्नाची मागणी; म्हणाली, “प्रिय प्राणनाथ…”

मुंबई | Bigg Boss 16 – बिग बॉस हा रिअॅलिटी शो लोकप्रिय शो असून तो कायमच चर्चेत असतो. तसंच आताही ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) हे पर्व चांगलंच गाजतंय. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकांनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. यापैकी एक म्हणजे बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व जिंकलेला स्पर्धक शिव ठाकरे (Shiv Thakare). शिव ठाकरे हा बिग बॉस 16 मध्ये सहभागी झाला आहे. शिवनं या पर्वात पहिल्या दिवसांपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसंच बिग बाॅसमध्ये काही दिवसांपासून शिव ठाकरेच्या लव्ह लाईफबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. त्यातच आता शिव ठाकरेला एका मुलीनं लग्नाची मागणी घालणारं पत्र पाठवलं आहे. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरत आहे.

शिव ठाकरेला बिग बॉसच्या घरात चक्क एका तरुणीनं लग्नासाठी मागणी घातली आहे. तिनं एक प्रेम पत्र लिहित प्रेमाची कबुली दिली आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅसच्या घरात ख्रिसमस स्पेशल भाग प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेता शेखर सुमन यांनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी बिग बॉसमधील स्पर्धकांना त्यांच्यासाठी आलेली काही मजेशीर पत्र वाचून दाखवली. यामध्ये शिव ठाकरेसाठी एक सुंदर प्रेम पत्र (Love Letter) आलं होतं. तसंच या पत्राला अगदी नवरीप्रमाणे सजवण्यात आलं होतं. या पत्रात त्याला एका तरूणीनं लग्नाची मागणी घातली आहे.

“प्रिय प्राणनाथ, बिग बॉसच्या घरात तू खूप साऱ्या मुली पाहिल्या असशील. पण मी तुला विश्वास देते की माझ्याइतकी संस्कारी मुलगी तुला कुठे शोधूनही सापडणार नाही. मी कधीही तुला टीनासारखी उलट उत्तर देणार नाही. तसंच सुमबुलसारखं मी सगळं काही निमूटपणे सहन करेन. कठीण प्रसंगातही मी तुझ्याबरोबर उभी राहिन. पण मी साजिद खानवर खूप नाराज आहे कारण तू आजकाल साजिदच्या खूपच जवळ जात आहे. का कुणास ठाऊक पण मला माझी सवत साजिदमध्ये दिसू लागली आहे. हे सगळं लग्नानंतर चालणार नाही”, असं या पत्रात लिहिलं आहे. सध्या शिवसाठी आलेलं हे प्रेम पत्र चांगलंच चर्चेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये