केएल राहुल सोबत हात मिळवल्यामुळे शुभमन गिल का होतोय ट्रोल?
IND VS AUS : इंदोर टेस्टमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल सर्वच फेल ठरले. शुभमन गिलला केएल राहुलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यामुळे त्याच्यावर सर्वांच लक्ष लागून होत. शुभमन चांगली सुरुवात करुनही अपयशी ठरला. गिलने फक्त 21 धावा केल्या. गिल आऊट झाल्यानंतर सोशल मीडियावर एका फोटो व्हायरल झालाय. ज्यावरुन आता वाद सुरु आहे.
शुभमन गिल आऊट होऊन ड्रेसिंग रुममध्ये परतला, त्यानंतर काहीवेळाने केएल राहुलने त्याच्याशी हस्तांदोलन केलं. फॅन्सनी याच मुद्यावरुन वादंग निर्माण केला. फॅन्सनी केएल राहुलला ट्रोल करायला सुरुवात केली.
केएल राहुल टीम बाहेर
केएल राहुलला इंदोर कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही. पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याने सुमार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हन बाहेर करण्याची मागणी सुरु होती. अखेर त्याला तिसऱ्या टेस्टमधून ड्रॉप करण्यात आलं. इंदोर टेस्टआधी त्याला उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. रोहित शर्माने उपकर्णधारपदी कोणाची निवड केली नव्हती. कारण उपकर्णधार असल्यास त्या प्लेयरला टीममध्ये खेळवणं भाग पडतं. आता केएल राहुलला प्लेइंग इलेव्हन बाहेर करण्यात आलं आहे.