मोठी बातमी! भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी20 सामना पाऊसमुळे होणार रद्द?

IND Vs NZ Serial 3rd T20 Match 2022 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यावर दुसरा सामना भारताने जिंकला. आता अखेरचा सामना उद्या अर्थात मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास मालिकाही भारत जिंकेल तर न्यूझीलंडने सामना जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटणार आहे.
दरम्यान, या निर्णायक सामन्यावेळी पाऊस आल्यास खोळंबा होईल हे नक्की. त्यात पहिल्या दोन्ही सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे पहिला सामना झालाच नाही. पण दुसरा सामना काहीशा व्यत्ययानंतर अखेर पार पडला. तर आता तिसऱ्या सामन्यावेळी हवामानाची स्थिती कशी असेल जाणून घेऊ.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या वेळे काही प्रमाणाच पाऊस पडू शकतो, पण सामना सायंकाळी सुरु होणार असल्याने सामना सुरू होईपर्यंत पाऊस थांबेल. सामना होणाऱ्या ठिकाणचं किमान तापमान हे 14 अंशांच्या आसपास असणार आहे. तर कमाल तापमान 28 अंशांच्या आसपास राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.