क्रीडा
भारताच्या यंगस्टर्सचा आफ्रिकेत जलवा; ‘इतक्या’ धावांंचं ठेवलं आव्हान!

मुंबई – IND vs SA | भारात आणि दक्षिण आफ्रिकेमधील टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी धुलाई केली आहे. दक्षिण आफ्रिकेला भारताच्या यंग स्टर्सने 212 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारताकडून सलामीवीर इशान किशनने अर्धशतक करत सर्वाधिक 76 धावा केल्या.
भारताच्या या स्टार युवा खेळाडूंनी आफ्रिकन गोलंदाजांच हवा काढली. मराठामोळ्या ऋतुराजला छाप पाडता आली नाही. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक फलंदाजी करत 36 धावा केल्या मात्र मात्र बोल्ड झाला.
दरम्यान, कर्णधार ऋषभ पंतनेही 16 चेंडूत 29 धाव केल्या तोही बाद झाल्यावर आलेल्या हार्दिक पंड्याने अवघ्या 12 चेंडूंमध्ये 31 धावा केल्या. यामध्ये 3षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे.