अश्विनचा षटकार! कांगारूंचा पहिला डावात 480 धावांचा डोंगर उभा, भारताची दमदार सुरूवात

अहमदाबाद (India vs Australia 4th Test Day 2) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राअखेर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला. आर अश्विनने डावात 6 बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियाला 480 धावांवर ऑल आऊट केले. उस्मान ख्वाजाने 180 तर कॅमेरून ग्रीनने 114 धावा केल्या.
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव 480 धावांवर संपला. उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून आर अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने बिनबाद 36 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 16 तर शुभमन गिल 17 धावांवर खेळत आहेत. भारत अद्याप 444 धावांनी पिछाडीवर आहे.
उस्मान ख्वाजा याने 180 धावांची संयमी खेळी केली. उस्मान ख्वाजा याने 422 चेंडूचा सामना करताना 21 चौकारांच्या मदतीने 180 धावा केल्या. उस्मान ख्वाजाशिवाय कॅमरुन ग्रीन याने 114 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ग्रीन याने 18 चौकार लगावले. त्याशिवाय मर्फीने 34 धावांची निर्णायाक खेळी केली. तर ट्रविस हेड 32, स्मिथ 38 यांनीही मोलाचं योगदान दिले. उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांची द्विशतकी भागिदारी हे ऑस्ट्रेलियाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. ख्वाजा आणि ग्रीन यांनी 358 चेंडूत 208 धावांची भागिदारी केली. मागील दहा ते 15 वर्षातील भारतामधील ही सर्वात विदेशी संघाची सर्वात मोठी भागिदारी आहे. त्याशिवाय लायन आणि मर्फी यांनी नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी करत भारताची डोकेदुखी वाढवली.