क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

BCCI घेणार मोठा निर्णय! 24 तासात बदलणार भारताचा वर्ल्डकप संघ? कोणाला डिच्चू कोणाला संधी

India vs Australia Rajkot ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 3 एकदिवसीय सामन्यांपैकी शेवटचा सामना उद्या बुधवार 27 सप्टेंबर रोजी म्हणजेच बुधवारी राजकोटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. शेवटच्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीबरोबरच हार्दिक पंड्या, कुलदीप यादव हे खेळाडूही खेळणार आहे.

वर्ल्डकपसाठी अंतिम 15 खेळाडूंची निवड करण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील हा शेवटचा सामना महत्त्वाचा मानला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडे म्हणजेच आयसीसीकडे भारताला वर्ल्डकपसाठीच्या आपल्या अंतिम संघाची यादी सुपूर्द करायची आहे.

त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मालिकेतील अंतीम सामना म्हणजे संघात कोणाला स्थान द्यावं आणि कोणाला नाही याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी शेवटची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे शेवटचे 2 सामन्यांमधील कामगिरी पाहता भारताचा वर्ल्डकपचा संघ बदलला जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळेच राजकोटच्या सामन्यानंतर पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच आयसीसीकडे वर्ल्डकपसाठी संघ सोपवण्याच्या शेवटच्या दिवशीच नव्याने वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये