क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारत पराभवाच्या छायेत? 37 धावांवर 4 धक्के, गिल, पंत, राहुल, कोहलींकडून निराशा!

ढाका : (India Vs Bangladesh 2nd Test Macth 3rd day 2022) भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका सुरु असून, दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने बांगलादेशचा 231 धावात गुंडाळला. बांगलादेशकडून लिटन दास (73) आणि झाकीर हसनने (51) झुंजार फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान ठेवले.

दरम्यान, 145 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदांना यजमान बांगलादेशी गोलंदाजांनी चारी मुंड्या चित केल्याचे पाहायला मिळाले. केएल राहुल, शुभमन गिल, ऋषभ पंत, विराट कोहली या दिग्गज खेळाडूंना सधी दोन अंकी धावसंख्या देखील करत आली नाही. त्यामुळे क्रिकेट प्रेमींची एकप्रकारे नाराशा झाल्याचे दिसून आलं आहे.

भारताचा कर्णधार केएल राहुल पुन्हा एकदा फेल गेला. शाकिब अल हसनने त्याला अवघ्या 2 धावेवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावला. मेहदी हसन मिराजने भारताला दुसरा धक्का देत, चेतेश्वर पुजाराला 6 धावांवर यष्टीचीत केलं. त्यानंतर मेहदी हसन मिराजने आधी शुभमन गिलला 7 धावांवर तर दिवस संपायला अवघी काही षटके राहिली असताना विराट कोहलीला 1 धावेवर बाद करत भारताची अवस्था 4 बाद 37 धावा अशी केली. त्यामुळे भारतीय संघ पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये