फायनलमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? अशा आहेत हायव्होलटेज सामन्याच्या शक्यता..

India Vs Pakistan Asia Cup 2023 Final Scenario : आशिया कप 2023 मधील सुपर-4 चा थरार आता रंगात आला आहे. मात्र, भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या कालच्या सामन्याची सर्वात जास्त चर्चा होत आहे. पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. पण सोमवारच्या राखीव दिवशी खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 228 धावांनी पराभवाची धूळ चारली.
क्रिकेट चाहत्यांना आता या आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामनाही पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये हा सामना होऊ शकतो. हा विजेतेपदाचा सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्येच खेळवला जाईल.
अशी मिळणार पाकिस्तानला फायनल संधी-
भारताने पुढील सामन्यात श्रीलंकेला हरवले तर टीम इंडियाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. पाक संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीमध्ये जिंकावा लागणार आहे. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर अंतिम फेरीत भारताशी सामना होईल. पुढच्या सामन्यात श्रीलंकेने भारताला हरवले तर टीम इंडियाला बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत पोहोचण्याची पूर्ण आशा असेल. पण अंतिम फेरीसाठी पाकिस्तानला त्यांच्या पुढच्या सामन्यात श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल. असे झाले तर भारत-पाकिस्तान यांच्यात होणार हायव्होल्टेज सामना पाहाण्यासाठी प्रेक्षक इच्छूक आहेत.