भारत Vs श्रीलंका! राजकोटच्या मैदानावर रंगणार ‘करो या मरो’चा सामना

गांधीनगर : (India Vs Sri lanka T-20 Series 3rd Match 2023) भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka)यांच्यात आज टी20 सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा अखेरचा सामना असून दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असल्याने ‘करो या मरो’चा हा सामना असणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने 2 धावांनी जिंकला. तर दुसरा सामना एकावेळी जिंकत आला असताना अखेर भारताने 16 धावांनी गमावला. त्यामुळे ही मालिका चुरशीची सुरु असल्याने आज अखेरचा सामनाही चुरशीचा असणार आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा इतिहास पाहता भारतीय संघ तब्बल 28 वेळा श्रीलंका संघाविरुद्ध (IND vs SL) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं कमालीचं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 28 पैकी 18 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, श्रीलंका संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
मागील वर्षी पार पडलेल्या आशिया कपमध्ये श्रीलंकेच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारत, पाकिस्तानला धूळ चारली अन् आशिया कप 2022 ता विजेता संघ म्हणून आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत यजमान संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. या सामन्यात भारतीय संघात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपली ताकद पणाला लावणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.