स्वप्न भंगल? एशियन गेम्समध्ये भारताला जोरदार झटका; श्रीलंकेकडून लाजीरवाना पराभव

India Women’s Cricket Team : बीसीसीआयने नुकतेच चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 साठी भारताचा पुरूष आणि महिलांच्या क्रिकेट संघाची घोषणा केली. बीसीसीआय टी-20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय महिलांचा पूर्ण क्षमतेचा संघ पाठवणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा केली जात आहे.
मात्र भारताच्या या अपेक्षाला आज तडा गेला. बांगलादेश महिला संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिल्याच वनडे सामन्यात 40 धावांनी पराभव करत स्टार संघाला मोठा धक्का दिला.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना भारताकडून अमरजीत कौरने 4 तर देविका वैद्यने 2 विकेट्स घेत बांगलादेशला 152 धावात रोखले. बांगलादेशला 152 धावात रोखल्यानंतर भारताची कसलेली फलंदाजी हे आव्हान सहज पार करेल असे वाटले होते.
मात्र डावाची 15 षटके होतात न होतात तोच भारताची अवस्था 5 बाद 61 अशी झाली होती. त्यानंतर दिप्ती शर्मा आणि अमरजीत कौरने डाव सावरत भारताला शतकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र 36 व्या षटकात बारेड्डी अनुशा धावबाद झाली अन् भारताचा पराभव निश्चित झाला. भारताचा संपूर्ण संघ 113 धावात गारद झाला. बांगालेदशकडून मारूफा अकतरने 4 तर राबेया खानने 3 विकेट्स घेतल्या.